विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे बालविकास आनंद मेळावा आयोजित
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञानासाठी मनोरंजनात्मक आनंद मेळावा उपक्रम आवश्यक
पी. बी. माळी
शिक्षण विस्तार अधिकारी
वडाळी बिट
गट संसाधन केंद्र शहादा
शहादा तालुक्यातील वडाळी येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाल विकास आनंद मेळावा 2022-23 आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन वडाळी बिट चे नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी पी.बी माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक तथा गावाचे पोलीस पाटील, गजेंद्रगिरी गोसावी हे होते तसेच जी.एस विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी.डी.पाटील होते कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला असून विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी युनिटचे आनंद मेळावा 2019-20 सर्व रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक झाले 2019 या वर्षी विद्यार्थ्यांन मार्फत 45 स्टॉल लागले होते त्यात एकूण 18,500/- रुपयांची खाद्य पदार्थ विक्री झाली होती परंतु या वेळी तब्बल 90 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले तसेच त्या ठिकाणी जवळपास सुमारे 37 हजार रुपयांची खाद्य पदार्थ विक्री विद्यार्थ्यांनी केली या वेळी
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञानासाठी मनोरंजनात्मक आनंद मेळावा उपक्रम आवश्यक आहे यात विद्याथ्यांना आकडेमोड व व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव येतो असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांकडून खाद्य पदार्थ खरेदी करत अंकज्ञान तपासणी केली
पालकांनी देखील अशा कार्यक्रमांची वेळोवेळी गरज असून कार्यक्रम आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून असतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला इंग्लिश मिडीयम चे प्रशासक चंद्रकांत रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्या सौ.प्रियंका पाटील व सर्व विकास इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले