पुणे (Pune) जिल्ह्यातील ग्रामीण भागाील २६ नोव्हेंबरपासून ११ मार्गावरील (PMPML) वाहतूक सेवा बंद होणार आहे.
ग्रामीण भागात सुरु केलेल्या मार्गावर कमी उत्पन्न होत असल्यानं PMPML कडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दरम्यान, अश्यातच आता पीएमपी प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस (PMPML) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आय महिलांचा पीएमपी बसमधून (PMPML) होणारा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. सोमवार (ता.२८) नोव्हेंबर पासून १९ मार्गावर २४ बस धावणार आहे.
तसेच या बसमध्ये (PMPML) महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी या बस सोडण्यात येणार आहे. उर्वरित वेळी या बसमधून पुरुष व महिला प्रवास करू शकतील.
या मार्गावर धावणार महिला बस
– स्वारगेट ते येवलेवाडी
– स्वारगेट ते हडपसर
– अ.ब.चौक ते सांगवी
– म.न.पा. भवन ते लोहगाव
– कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी (बी.आर.टी मार्ग )
-(बी.आर.टी) कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
– (बी.आर.टी)कात्रज ते कोथरूड डेपो.
-हडपसर ते वारजे माळवाडी
– भेकराईनगर ते म.न.पा. भवन
– हडपसर ते वाघोली (केसनंद फाटा)
– अप्पर डेपो ते स्वारगेट. (बी.आर.टी)
– अप्पर डेपो ते पुणे स्टेशन
– पुणे स्टेशन ते लोहगाव
– (बी.आर.टी) म.न.पा. भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
-(बी.आर.टी) निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे )
– निगडी ते भोसरी.
-तेजस्विनी निगडी ते हिंजवडी.
– चिंचवडगाव ते भोसरी. या मार्गावर या गाड्या धावतील याची दखल पुणेकरांनी घ्यायला हवी.
न्यूज प्रतिनिधी: दिगंबर वाघमारे