जिल्हा परिषद शाळा वेळूक , ता मुरबाड येथे संविधान दिन विविध उपक्रम आयोजन करून साजरा!
मुरबाड दिनांक 27 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतिय राज्यघटनेचा वर्धापन दिन म्हणजे 26 नोव्हेबर ,हा दि हवावस सर्वत्र भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो,जिल्हा परिषद शाळा वेळूक ,येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,सर्वप्रथम भारतीय संविधान ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच हातात घोषवाक्ये फलक घेऊन वाजत गाजत ,सबसे प्यारा ,संविधान हमारा ,जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा,आपले संविधान आपला सन्मान,स्वातंत्र्य ,समता, बंधुता संविधान सांगते समानता यासारख्या घोषणा देऊन गावात संविधान जागृती फेरी काढण्यात आली ,संविधान फेरीचे ग्रामस्थानी स्वागत केले तसेच माता बचत गटाच्या सौ गौरीताई वारघडे यांनी आरती ओवाळून प्रभातफेरीचे स्वागत तसेच
शाळेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला ,यावेळी संविधानाची प्रस्ताविका सामूहिक वाचन करण्यात आली ,यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार जाधव यांनी आपल्या मनोगतात ,संविधान सभेची स्थापना ,संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान,संविधानात अंतर्भूत असलेले हक्क ,अधिकार तसेच आपले कर्तव्य ,शिक्षणाचा हक्क व संविधानामुळे भारताचा झालेला विकास यावर मार्गदर्शन केले तसेच संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी संविधानावर आधारित स्वातंत्र्य समता बंधुता या गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत इयत्ता सहावी चा समता गट विजयी झाला ,संपूर्ण स्पर्धा शिक्षक श्री अतुल वाबळे यांनी पार पाडली ,गुणलेखक म्हणून श्री सदाशिव चोरे यांनी काम पाहिले
संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ गायत्री जोशी व शिक्षक श्री आनंद खवणेकर यांनी मेहनत घेतली
मुबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली
शाळेच्या वतीने सर्व विदयार्थ्यांना लाडू वाटप करून संविधान दिनी तोंड गोड करण्यात आले