रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन राज्यस्तरीय अधिवेशनाची आढावा बैठक संपन्न. मुरबाड दिनांक 27 प्रतिनिधी लक्ष्मण पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.रामदास आठवले यांच्या आदेशाने दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी कल्याण येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशनाची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह मुरबाड येथे आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये अनेक मुख्य विषयांवर चर्चा करण्यात आली. नियोजन करण्यात आले व विभिन्न पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यावेळी अधिवेशनासाठी जास्तीत जास्त कर्मचारी कामगार कसे उपस्थित राहतील याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच कामगारांचे विविध प्रश्न या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत जसे जुनी पेन्शन योजना,पदोन्नती आरक्षण,बेरोजगारांचे प्रश्न,अनुशेष भरून काढणे, परिचारिकांचे प्रश्न,शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या,माथाडी कामगार ,नाका कामगार यांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचे सांगण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी संपर्कप्रमुख संजय थोरात उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक ठाणे जिल्हा नेते भगवान पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे मुरबाड माजी नगरसेवक रवींद्र देसले सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र थोरात ठाणे जिल्हा सरचिटणीस गौतम रातांबे मुरबाड तालुका अध्यक्ष सेवक नागवंशी, मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विजय घायवट,तालुका सरचिटणीस विलास शिंदे सल्लागार शिवराम उबाळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत चव्हाण तालुका उपाध्यक्ष प्रमोद भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापले योगदान द्यावे असे प्रतिपादन ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे यांनी केले.