संविधान दिनानिमित्त वावर आश्रमशाळेत जनजागृती करण्यात आली
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
२६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जात असून जव्हार तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेली प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यांनतर चिकाडीपाडा ,वावर अशी प्रभात फेरी काढण्यात आली.तसेच सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले व संविधान जनजागृती करण्यात आली. संविधानानिमित्त बालपंचायत २०२२,२३ निवडणूक प्रक्रिया कशी असते ते प्रत्यक्ष निवडणूक घेवून प्रात्यक्षिक रूपाने घेण्यात आली व विजयी झालेल्या कु. प्रेम नवसू या विद्यार्थांस शाळेचा मुख्खमंत्री बनविण्यात आले .या प्रसंगी वावर आश्रमशाळा चे मुख्याध्यापक श्री गारूडकर सर, सोळंके सर,रणधीर सर ,राठोड सर,पाटील सर,तसेच भामरे सर व कोल्हाळ सर,निकुंभ सर , बर्डे सर, व इतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.