सायले-उमरोली परिसरात बिबट्याचा हैदोस | बिबट्याने पाडला हरीणीचा फडशा !
रविवार, नोव्हेंबर २७, २०२२
0
सायले-उमरोली परिसरात बिबट्याचा हैदोस | बिबट्याने पाडला हरीणीचा फडशा !
मुरबाड तालुक्याचा परिसर हा भिमाशंकर, क़ळसूबाई ,हरिचंद्रगड, या तीन अभयार-ण्यांच्या हदि्त येथील ७५ गाव येतात . या अभयारण्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात, सर्वत्र आजमितीस "जंगलराज" सुरू असून, एका बाजूला शासन वनिकरणा-या नावाखाली त्याचं त्याचं खड्ड्यात कोट्यावधींची वृक्षलागवड मोहिम राबवित आहे . या अभयारण्य क्षेत्रात वाढती वृक्षतोड, पाण्याचा तुटवडा,यामुळे वन्यप्राण्यांना अन्नांविना उपासमारी ,खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसल्याने वन्यप्राणी माकडं,वानरं, हरीण,भेकरं ससे, रानटी- डुक्कर,निलगाय, इत्यादी प्राणी गाव वाड्या-पाड्याच्या वस्त्यांकडे अन्न व पाण्याच्या शोधात येतात . आणि त्यांचा माग (शोधघेत)काढीत वाघ, लांडगे तरसं बिंबट्या सारखे हिंस्त्रप्राणी देखील गाव वाड्या पाड्या लगत येऊ लागले आहेत. गुरूवार दि २४ रोजी सकीळी ७ वाजता उमरोली -सायले गावालगत हरणीचा कळप जात असता बिंबट्यानं थरार पाठलाग करीत एका हरीणाची शिकार करून त्याचा मागिल भाग फस्त केला.
Tags