Type Here to Get Search Results !

धन्यवाद मोदीजी अभियानाला मुरबाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद



धन्यवाद मोदीजी अभियानाला मुरबाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

एन एन गायकर यांनी केले 200 धन्यवाद मोदीजी कार्डचे वाटप 

मुरबाड  दिनांक 27- प्रतिनीधी लक्ष्मण पवार 



  देशाचे पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सूरु केलेल्या देशातील नागरिक , शेतकरी व कामगारांसाठी करण्यात आलेल्या ३६ योजना थेट लाभार्थी च्या खात्यात जमा होत असल्याने देशात एक नविन क्रांती घडली आहे. यातून भ्रष्टाचार मुक्त भारत हे धोरण असून नागरिकांचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने मुरबाड मधे  भाजपा कामगार   मोर्चाचे ठाणे ग्रामिणचे  अध्यक्ष संतोष पवार यांनी धन्यवाद मोदीजी अभियान कार्यक्रमाचे आयोजन एम. आय . डी. हाॕल येथे करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे , जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे , कामगार प्रदेश सरचिटणीस रेखाताई बहनवाल , भाजप कामगार मोर्चा ठाणे ग्रामिणचे  सरचिटणीस अनिल पांडे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस नितिन मोहपे , तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव ,  नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे , दिनेश उघडे , सुरेश बांगर उपस्थित होते.   



         यावेळी ताठे यांनी भारत सरकारच्या कामगार ,शेतकरी व  नागरिकांसाठी ज्या महत्वाकांक्षि योजना आहेत त्यांची माहिती देण्यासाठी धन्यवाद मोदीजी या अभियानातून राज्यभर ३० आॕक्टोंबर ते ३० नोव्हेंबर असा ६०१३ कि.मी. दौरा केला असून आता पर्यत २५ जिल्हाचा प्रवास केला आहे.  धन्यवाद मोदीजी अभियाना अंतर्गत सुमारे १५ लाख पञे पंतप्रधानांना  पाठविण्यात आली असून त्यापैकी २ लाख पञे ही निव्वळ कामगारांची आहेत. ई- श्रमकार्ड ची मुदत वाढ मिळावी म्हणून देशाचे कामगार मंञ्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले  . याप्रसंगी कामगार मोर्चाच्या ठाणे ग्रामिण सरचिटणीस पदी अशोक धुमाळ व तालुका उपाध्यक्ष पदी अमोल मुरबाडे यांना नियुक्तीचे पञ देण्यात आले.    

   मुरबाड मधील औदोगिक क्षेञातील बंद असणारे कारखाने तसेच कामगारांच्या विविध प्रश्नासाठी राज्याचे कामगार मंञी यांची वेळ घेऊन चर्चा करणार असल्याचे जिल्हा ग्रामिणचे अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. तर अनिल पांडे यांनी ई श्रमकार्डची मुदतवाढ करण्याची मागणी केली.  मुरबाड मधून भाजपा युवा कार्यकर्ते एन.एन.गायकर यांनी थेट मोदीजीना २२१ पञे पाठविण्यात आली असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा घगे  यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad