भारतातील करोडो रेशनकार्डधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण सरकारकडे लोकांना रेशन दुकानांतून धान्य घेताना वजनात मोठी तफावत जाणवल्यामुळे कमी धान्य मिळत असल्याच्या आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. यावर केंद्र सरकारने आता कायमस्वरूपी तोडगा काढत मोठा निर्णय घेतला आहे.
देशात करोडो नागरिक मोफत रेशनचा लाभ घेत असतात. यामध्ये गहू आणि तांदूळ आणि डाळ याचा लाभ नागरिकांना मिळत असतो. रेशन दुकानातून हे रेशन घेताना वजनात धान्य कमी मिळते, अशी काहींनी तक्रार केली आहे. आता नव्या नियमानुसार, आता रेशन दुकानात ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस अनिवार्य केले असल्याची माहीती आहे.
केंद्र सरकारने देशातील रेशन दुकानात पीओएस डिव्हाईस कायमस्वरूपी वापरण्यास सांगितले आहे. महत्वाचं म्हणजे एवढंच नव्हे तर केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलशी जोडण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत. यामुळे रेशन दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक स्केल ठेवणे असता सक्तीचे केले आहे. ज्यामुळे नागरिकांसोबत वजनात होणारी छेडछाड धान्य घेताना रोखली जाऊ शकते.
दरम्यान केंद्र सरकार अन्न सुरक्षा कायदा नियम अंतर्गत लाभार्थ्यांना रेशन दुकानामार्फत योग्य प्रमाणात अन्नधान्य पुरवठा होत आहे का याची खात्री केली जात असते. आता या डिव्हाईसमुळे रेशन घेणाऱ्या नागरिकांना जेव्हा रेशन घेताना वजनात होणारी फसवणूक लक्षात येण्यास मदत होणार आहे. यामुळे जर काही रेशन दुकानदारांनी फसवणूक केली तर ही बाब लोकांच्या त्वरित लक्षात येणार आहे