जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पिपंळशेत पैकी कोतीमाळ या गावामध्ये तारा आदिवासी सामाजिक संस्थेचे संस्थापक यांच्या सहकार्याने अंधारात रस्ता काढत जाण्याच्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले. या मध्ये बसस्टॉप जवळ तसेच गावात काही ठिकाणी पथदिवे लावण्यात आले.
ग्रामपंचायत कडून बऱ्याच ठिकाणी पथदिवे लावण्यात आले होते परंतु मोक्याच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी नेमकी गरज आहे असा ठिकाणी मात्र पथदिवे नव्हते हे वारंवार ग्रामपंचायत ला निदर्शनास आणून देऊनही कोणतीच हालचाल केली जात नव्हती हीच नागरिकांची समस्या लक्षात घेता सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन पथदिवे लावून अंधार दूर केला आहे. या प्रसंगी विलास भोवर, बाबुलाल सवरा, महादू साठे, अनंता मोरे, महादू हिरकुडा, कल्पेश मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.