पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत खरोंडा मधील अती दुर्गम असं हुंबरण पाडा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षीही अजून मूलभूत सोई सुविधान पासून कोसो दूर आहे. काही दुर्दैवी घटना घडतात तीन चार दिवस विविध माध्यमातून चर्चा होते अधिकारी नेते मंडळी येतात सहानुभूती दाखवून आश्वासने देऊन जातात पण प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती जैसेही असाच प्रकार गेल्या दोन वर्षा पूर्वी एका गरोदर मातेला वेळेत दवाखान्यात न पोचल्यामुळे नवाजात बालकाचा मृत्यू ची घटना या गावात घडली होती ह्या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते, या मुळे कुठे तरी बदल घडेल असं वाटत असताना अजूनन ही या गावात सोई सुविधा पोचल्याच नाहीत.
तालुक्यातील शेवट च्या टोकातील आदिवासी बांधवांची लोक वस्ती असलेले गाव असून अनेक सामाजिक समस्या ह्या गावात मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. रस्ता नसल्या मुळे नागरिकांना जंगलातून डोंगर दरी चढ पाई उतार करून डोली (झोळी) बांधून आजारी पेशंट दवाखान्यात न्यावे लागतात. या भागात विविध दुर्दैवी घटना घडतात पण त्याच्या सोई सुविधान साठी पुढे मात्र कुणीही येत नाहीत. या कडे आता तरी लोक प्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून या गावाच्या विकासासाठी योग्य विकासात्मक आराखडा तयार करून प्रत्यक्षात प्रयत्न करावे असे या ग्रामस्थाची मागणी आहे.