Type Here to Get Search Results !

स्त्री आणि तिची संविधानिक ओळख


स्त्री आणि तिची संविधानिक ओळख
 
ठाणे मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार  


         - सविताताई 
सामाजिक विषमता हि जात, धर्म, पंथ आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे.
ज्या देशात कुत्र्याला भाकर, मुंगीला साखर, सापाला दुध आणि गायीला हे फक्त पुण्य मिळवण्यासाठी करतात, त्याच देशात
यत्र नार्यस्तू पूजँते तत्र रमंते दैवत: म्हणजे एका बाजूला दुर्गा, भवानी या स्त्रीशक्तीला पुजले जातात, त्याच देशात स्त्रियांवर सतत अन्यायकारक अत्याचार केला जातो. 


 पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले असून आजच्या डिजिटल युगात विविध बॅनर वरील नावे, फोटो पहाता लक्षात येते. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे. अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते. धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली. सतीप्रथा, हुंडाप्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतिनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले. भारतात ब्रिटीशांचे आगमन होईपर्यंत या निर्दयी प्रथा चालूच होत्या. ब्रिटीशकाळात शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता जोतीराव फुले आणि जननी सावित्रीमाई फुले, राजा राममोहन रॉय यासारख्या भारतीय समाजसुधारकांची स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटीशांचा स्त्री विषयक पाश्चात्य दृष्टीकोन यामुळे ब्रिटीशानी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले.

चूल आणि मूल या भोवती फिरणारी स्री आता स्वछदपणे मनमोकळ्या प्रमाणे बागडू शकते, फिरू शकते, आपले विचार मांडू शकते, हे सर्व गोष्टी शक्य झाल्या त्या संविधानामुळे आणि मिळालेल्या अधिकारामूळे ती मुक्त संचार करू लागली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक ठिकाणी ती पोहोचली आहे. स्त्रियांना त्यांचे अधिकार प्राप्त होण्यासाठी संविधानाचे मुख्य शिल्पकार, धर्मचिकित्सक, मानववंशशास्त्रज्ञ, जागतिक विचारवंत, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहिले, हे किती स्वतःला पुरोगामी महिला म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांना माहीत आहे. 


कला, क्रिडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून आहे. सरपंच ते राष्ट्रपती, शाळेत शिक्षिका असो की पोलीस सेवादलातील निरीक्षक असो या सर्व महिला ज्या पदावर कार्यरत आहेत त्या फक्त आणि फक्त संविधानामुळे.पण असे असूनही तिची ओळख निर्माण होऊन सुद्धा आजच्या डिजिटल युगात स्त्रियांवर होणार्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून देत असते. ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणार्या तक्रारीवरून लक्ष्यात येत असते. परंतु नोंद होणार्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. आधीच्या सरकारच्या व आताच्या सरकारच्या घटनांवर एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल. स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्यक आहे ती जनजागृती. स्त्रियां/मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. आणि रेल्वे परिसरात, बसस्थानक, शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत. यासाठी शासन निर्णय काढून चालणार नाही तर त्याची काटेकोर अमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवण्या करिता उपाययोजना करणे आवश्यक आहे. आजकाल डिजिटल प्रेमप्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेहि समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रेम करणे हि वाईट गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नंगानाच चालू असतो, तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात फारच आघाडीवर आहेत. प्रेम हि उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरु होतो. अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात. महिलांना आजच्या डिजिटल युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. परंतु आता सरकारने केलेले कायदे हे फार महत्वाची भूमिका पार पडत आहेत .  


महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते कि, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो कि, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यमच स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते. 

आज ह्या देशाला राजमाता जिजाऊंच्या, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा असताना आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली कि, तिला घरातुनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. हीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अंहमपनाचा सामना करावा लागतोय. आजकालच्या लोकांच्या मानसिक विचारात बदल होण्याची गरज आहे. 

 
 जिजाऊ-सावित्रीची लेक प्रत्येक घरात निर्माण झाली पाहिजे, ज्या जिजाऊने महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले, माझ्या शिवरायाच्या राज्यात महिला सुरक्षित हित्य, शेतकरी आत्महत्या करत नव्हते कारण महाराजांनी आदेशानुसार शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, शिवाजी महाराजांच्या काळात सुराज्य म्हणजे रयतेचे राज्य होते, ते आता कुठेतरी अंधारात हरवले आहे, याला कारण आहे आताचे सरकार जे सत्तेत बसले आहे, ह्या सरकारला भारतीय नागरिकांची काही घेणं देणं नाही. महिला सुरक्षा, बेरोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. संविधानात Article १४ सांगते की कायद्यापुढे सर्व समान आहेत मग स्त्रींयाना दुय्यम स्थान देणारे हे कोण. 


संविधानाने ह्या देशातील नागरिकांना ओळख दिली आहे ती म्हणजे भारतीय आणि आमच्या राष्ट्राचं नाव भारत आहे आणि भारतीयत्व हेच नागरिकत्व. 


 इंडियन्स सोशल मुव्हमेंट द्वारे या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन गेली अनेक वर्ष सातत्त्याने लोकजागृतीचे काम सुरु आहे. आज देशाची सामाजिक, आर्थिक, राजकिय घडीच संपूर्ण विस्कटली गेली आहे. 


याकरिता सरकारने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे. देशातील सर्व नागरिकांना संविधान साक्षर होणे गरजेचे आहे कारण ह्या देशातील राज्यकर्ते जर तुमचे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुते वर आधारित मुलभूत अधिकार नाकारीत असतील तर इथल्या प्रस्थापितांना उलथवून टाकायचे असेल तर इथल्या नागरिकांनी, विशेषतः स्त्रियांना संविधान साक्षर होण्याची गरज आहे, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी म्हणजे एक स्त्री सर्व कुटुंबातील लोकांना सांभाळून घेते तर हा देश किती चांगल्याप्रकारे सांभाळेल हे चित्रच किती वेगळे असेल. एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मिळणे हे संविधानिक अधिकार आहे.

ISM ही मानवी मुल्यांवर आधारीत आणि लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कटिबध्द असणार्‍या भारतीय संविधानाच्या प्रचार प्रसार आणि अमलबजावणी करीता तत्पर असलेल्या तमाम भारतीय जनतेचा परिवार आहे. या परिवाराचा आमच्यावरील विश्वास प्रेम आणि तन,मन,धन आणि बुध्दि या द्वारे सम्यक सहभाग हा यापुढेही असाच वृध्दिंगत होवो हिच अपेक्षा.

 आज प्रत्येक जागृक भारतीयाचे खरे कर्तव्य आहे की, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी उपायोजना करण्याची. 
व तसे करण्यास इजम प्रथम प्राधान्य देत व समर्पित आहे.

आता आम्ही भारताचे लोक....
 जोश मध्ये नव्हे...होश मध्ये
कार्यरत राहणार कारण आम्ही...
प्रथमतःआणि अंतिमतः भारतीय आहोत!

सविता सुखदेव सोनावणे
इंडियन्स सोशल मुव्हमेंट
राष्ट्रीय अध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad