याबाबत सविस्तर वृत्त कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत समस्त हिंदू समाज व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. यावेळी बोलताना मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अश्या प्रकारची अतिशय चुकीची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
अश्या प्रकारे राहुल गांधी नेहमीच बरळत असतात. त्यांनी असे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे,अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षा ही अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल." यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, भाजपाचे सुनिल रासने, शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार,दिलीप सुपारे, गणेश डोमकावळे,केशव भुजबळ,डॉ.नीरज लांडे,महेश फलके, अण्णासाहेब ढोबळे,जगदीश धूत, ज्ञानेश्वर देहाडराय,बाप्पू धनवडे,मछींद्र भडके,किरण काथवटे,अमोल माने, यांच्या सह मनसेचे व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहा.पोलिस निरिक्षक विश्वास पावरा,गुप्त वार्ताचे बप्पासाहेब धाकतोडे, पो.काॅ. अशोक लिपने पो.कॉ. प्रविण बागुल यांनी याठिकाणी धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्या कलम ३७(१) चे उल्लंघन केल्या प्रकरणी मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, सुनिल रासने,भाजपाचे शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार,केशव भुजबळ, डॉ.नीरज लांडे, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.