मुरबाड प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
तालुक्यातील शेलारी ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती मुरबाड यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभहस्ते झाले.
आमदार किसन कथोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गावात शांतता असेल तरच गावाचा विकास होईल असे सांगून व्यायाम शाळा माध्यमातून तालुक्यात क्रांती झाल्याचे सांगितले
. व्यायामशाळा साहित्य, रस्ते या साठी ५ लाख मंजूर करून घेतले असून नढई नारिवली रस्त्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आ. कथोरे यांनी सांगितले.
तर या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा व कार्यालयासाठी निधी गावाला दिला असला तरी रस्त्यासाठीही निधी देण्याचे कबूल केले याप्रसंगी मुरबाड पंचायत समितीच्या सभापती स्वराताई चौधरी, माजी उपसभापती रामभाऊ दळवी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी गटनेते पंचायत समिती अनिल देसले, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत सासे,ओबीसी भाजपा सेल अध्यक्ष सुरेश बांगर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख संतोष विशे, सरपंच दर्शना बांगर, सरपंच मनाली गोरले, सेक्रेटरी महेश आगिवले, पाटगांवचे नामदेव दमाणे, मुख्याध्यापक रघुनाथ पडवळ, प्रदिप सासे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप पष्टे इत्यादी उपस्थित होते.
शेलारी ग्रामपंचायतीच्या सरपंच चंपाताई बांगर, उपसरपंच कमलाकर भोईर, सदस्य जयेश विशे, बबन पवार, स्नेहा भोईर, विद्या भोईर, मालती भोईर, ग्रामसेविका अश्विनी साठे, ग्रा. पं. कर्मचारी अनिल भोईर यांनी विशेष सहकार्य या वेळी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन भोईर, माजी सरपंच नारायण बांगर, काळुराम भोईर, यशवंत भोईर, सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन जगन्नाथ भोईर, माजी सरपंच लक्ष्मण भोईर, कृष्णा भोईर, अरुण भोईर, मनोज विशे, मालू विशे, उद्योजक नरेश भोईर,नंदू भोईर, वामन भोईर, विनायक भोईर, बाळकृष्ण परसु भोईर, नारायण भोईर, रमेश भोईर, प्रकाश भोईर, विजय भोईर, शिवाजी भोईर, कॅटर्स मारुती भोईर, सुधाकर भोईर, अविनाश भोईर, भास्कर बांगर, भालचंद्र भोईर, शरद भोईर,जयेश बांगर, यशवंत वाघ , सुमनताई भोईर, छायाताई भोईर यांनी विशेष मेहनत घेतली.