पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर
भारताचा विर जवान अशा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर रोजी झाला असून त्यांची जयंती संपूर्ण भारतात केली जात असून आज अतिदुर्गम भाग असलेला मोखाडा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात देखील जयंती साजरी करण्यात आली. आज वाकडपाडा येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त वीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या बद्दलची माहिती यावेळी देण्यात आली. व वीर राघोजी भांगरे अमर रहे च्या जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी विजय वाघ, नरेंद्र वाघ, गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य, रजनीकांत वाघ, कुसुम वाघ, पुष्पा वाघ, पुनम खांदे, नतिन वाघ, अरुण धोंगडे, सागर शिंदे, जीवन वाघ अभिनया वाघ इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.