Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या मोहिते पाटलांनी ऊसाची पहिली उचल 2500 रपये जाहीर करावी राहुल बिडवे यांचे जाहीर आवाहन




शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या मोहिते पाटलांनी ऊसाची पहिली उचल 2500 रपये जाहीर करावी राहुल बिडवे यांचे जाहीर आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना या वर्षी ऊस आंदोलनात एकत्र येऊन साखर कारखानदाराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे दोन साखर कारखाने आहेत ते नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध आसतात सहकार महर्षिच्या शिकवणीप्रमाणे यावर्षी ऊसाला पहिली उचल 2500 रुपये जाहिर करावी असे जाहीर आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते राहुल बिडवे यांनी केल्यामुळे येणाऱ्या काळात बोरगावकर व अकलूजकर यांच्या मध्ये नवीन वादाची ठिणगी पडणार असे स्पष्ट दिसते.

शेती हा व्यवसाय नसुन संस्कृती आहे शेतकरी हा या देशाचा बळीराजा आहे मात्र या महागाई च्या काळात आज शेती करणे खूप अवघड बनले आहे
खत,तननाषक,किटकनाशक, लिक्विड यांच्या किमती गगनाला भिडले आहेत याकडे सरकार लक्ष देणार आहे का नाही शेतकऱ्यांच्या सुशिक्षित पोरांनी यावर विचार केला पाहिजे व ऊस आंदोलनात सहभागी झाले पाहिजे

एक टन ऊसाचा हिशोब                                 

              सरासरी रिकाव्हारी 11% धरून
                                                                    
  1% इथेनॉल साठी सोडतात. ज्या कारखान्याला इथेनॉल प्रकल्प नाही ते साखर कडतात.
  
                10% रिकव्हारीला 100 kg साखर
                40 kg मोलासिस त्यापासून 11 लिटर इथेनॉल
                240 kg bagas
                35 युनिट वीज
                90 kg प्रेस्माड इत्यादी उपपदार्थ तयार होतात
          
      साखर 100kg चे - 3470
      मोलासीस विकले तर 320
      त्यापासून इथेनॉल तयार केले तर इथेनॉल 11 लिटर - 463.32
      बग्यास 240 kg चे 200
      वीज 30-35 युनिट 200
     प्रेसमड मळी,घाण पाणी,राख हे चेअरमन च्या चहा पाणाला सोडुन 
         3470
       +463
       +360
       +200
      =4333

वरील 11% पैकी आपण 10% रिकव्हरीचा हिशोब केला आहे.
आपण हिशोबात न धरलेल्या 1% पासुन इथेनॉल निर्मिती केली तर 9 लिटर इथेनॉल तयार होते ते 62 रूपये लिटरने विकले जाते त्याचे 558 रूपये मिळतात

ज्या साखर कारखान्याकडे इथेनॉल प्रकल्प नाही ते या 1% पासुन साखर तयार करतात त्या 10 kg साखरेचे 340 रूपये म्हणजे
            4333+558=4891 रूपये इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला मिळतात
            
जे कारखाने इथेनॉल निर्मिती करत नाहीत
4333+340=4673 रूपये तयार होतात

उत्पादन खर्च
तोडणी-वाहतूक=600-700
पगार. =150
प्रो. खर्च. =250
व्याज. =100
एकुण. =1150

एकुण एकूण उत्पन्न वजा उत्पादन खर्च
रिकव्हरी 11% धरली तर 
4891-1150=3741 रूपये
4673-1150=3523 रूपये

रीकव्हरी 10% धरून जरी हिशोब केला तर 4333 रूपये एक टन ऊसापासुन मिळतात
4333-1150=3183 देता येतात

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारानी ऊस उत्पादकाची खर्याअर्थाने चेष्टा चालवली आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातचा ऊसदर आणि सोलापूरचा दर यामध्ये एक हजार रुपये चा फरक आहे सगळ्याच वस्तू चे भाव वाढले मात्र ऊसाचा भाव तेवडाच राहिला कारखानदारानी तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
मा.आ.सदाभाऊ खोत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad