पालघर जिल्हा प्रतिनिधी:सुनिल जाबर
मोखाडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायत मधील निवडणूक निकाल आला असून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमा देऊन त्यांचे अभिनंदन आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ व पदाधिकारी यांनी केले आहे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन अशा पद्धतीने सत्कार करणे, नवीन पदाधिकारी यांची ओळख करून, भविष्यात ग्रामपंचायत मधील विकास कामे करण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
यामुळे निवडणूक काळातील पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या गावाचा विकास कशा होईल या कडे आपण सर्वांनी जनतेच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे.
मोखाडा तालुका हा अतिदुर्गम मध्ये असलेला तालुका आहे आणि हा खूपच भाग मागासलेला आपल्याला दिसून येत आहे आणि या भागात विकास होणे खूप गरजेचे आहे.या प्रसंगी प्रदीप वाघ,रमेश बोटे ,मंगेश दाते,अशोक वाघ , विष्णू हमरे,नंदकुमार वाघ,संजय हमरे ,गणेश खादे ,सागर वराटे,व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे चे सर्व पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.