शेतकऱ्यांना मदतीची रक्कम खात्यावर येईपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नका;कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश;
माळेगाव(पिंप्री) गावातून थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून वीजपुरवठा खंडित न करण्याचा सूचना देतांना दुसऱ्या छयाचित्रात माझी वीज खंडित करू नका यासाठी थेट ८० वर्षीय महिला शेतकरी कृषीमंत्री यांची भेट घेतांना.
सोयगाव, ता.२१...थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विजपापंचा रोहित्रवरून शेती पंपाची वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणच्या वीजमंडळाकडून
सोमवारी दि.२१ सोयगाव तालुक्यात घेण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती,आणि खरिपाची पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे हातावर आलेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती पहाविली न गेल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट माळेगाव(पिंप्री) गावातून थेट महावितरण च्या अधिकाऱ्यांना फोन लावून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा आणि नुकसानीची रक्कम येईपर्यंत एकही रोहित्र वरून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा सूचना केल्याने एक फोन करताच सोयगाव तालुक्यातील महावितरणची मोहीम अवघ्या दहा मिनिटात ठप्प झाली होती.
सोयगाव तालुक्यातील शेतकरी नुकसानीमुळे हातावर आलेला आहे त्यातच रब्बीच्या हंगामा साठी जळलेल्या रोहित्र मुळे शेतकरी हताश झाला आहे रोहित्र जळल्यावर देयक भरूनही शेती पंपाचे रोहित्र तीन तीन महिने मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे केल्या त्यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट फोन वरून धारेवर धरून तातडीने शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून घ्या व त्याबाबत अहवाल सादर करावा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीच्या नुकसानीचे व पीकविमा ची रक्कम खात्यावर वर्ग होईपर्यंत सोयगाव तालुक्यातील एकही रोहितरावरील वीज जोडणी खंडित करू नका असे त्या महावितरण च्या अधिकाऱ्यांना फोन वरून सांगताच सोयगाव तालुक्यातील महावितरण ची वीज पंपाची वीज खंडित करण्याची मोहीम अवघ्या दहा मिनिटात थांबली होती.
कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ही आवाहन
अतिवृष्टीच्या नुकसानीची व पिकविम्याची मदतीची रक्कम खात्यावर वर्ग होताच शेतकऱ्यांनी वीज देयकाच्या थकीत रक्कमेपोटी पाच हजार रु महावितरण कडे तातडीने भरावीत असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले असून मात्र त्या आधी जर कोणाची शेती पंपाची वीज खंडित केल्यास थेट मला फोन करा असेही सांगितले त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे....