तीन जि. प.परिषद / एक हायस्कूल
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार:-दिनांक २१/११/२०२२ रोजी जव्हार तालुक्यातील वडोली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच कामिनी दिपक गावंढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्रामसभा झाल्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे साधन म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच मँडम यांच्या प्रयत्नाने महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे , ता -डहाणू, जि -पालघर यांच्या सहकार्याने -किशोर वसंत सातवी सर यांनी वह्या उपलब्ध करून दिल्या. ह्या वह्या जि. प. शाळा वडोली, जि. प. शाळा चिरेचापाडा, जि. प. शाळा रातोणापाडा आणि प्रभा हिरा गांधी वडोली हायस्कूल येथे वितरीत करण्यात आल्या. यावेळी उपसरपंच रघुनाथ भोये, सदस्य रुपेश खुताडे, संदिप धुम, कल्पना भोरे, निशा भोये, संगिता धुम सह ग्रामसेविका मिरा वाघमारे उपस्थित होत्या.
तसेच नवनियुक्त IBN लोकमत चे पत्रकार प्रल्हाद कांगणे,गुरूनाथ चौधरी (मा. सभापती) अशोक भसरा (शा.व्य.समिती अध्यक्ष) तसेच आजी -माजी सरपंच ,सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत कमेटी व महालक्ष्मी ट्रस्ट, विवळवेढे यांचे आभार व्यक्त केले.