दहा दिवसांत मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांशी संवाद साधताना
सोयगाव, दि.२१...खरिपाच्या पिकविम्या बाबत कंपन्यांशी परिपूर्ण चर्चा झालेली असून पिकविम्याच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नुकसानीच्या पूर्वसूचनेच्या पंचनाम्यांच्या गती अंतिम टप्प्यात आली असून दहा दिवसांत सर्व बाधित शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी केली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिकविम्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवारी सोयगाव तालुका दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचेशी सोयगाव तालुक्यातील पिकविम्या बाबत संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की सोयगाव तालुक्यात खरिपाच्या पीक विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये खरिपाचा पीकविमा काढलेल्या व नुकसानीच्या पूर्वसूचना केलेल्या शेतकऱ्यांची यादी पहिल्या टप्प्यात तयार करण्यात येत असून त्यानंतर पीकविमा भरला परंतु ऑनलाइन पूर्वसूचनेच्या तक्रार केली आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या कंपनी स्तरावर तयार करण्यात येत आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील पीकविमा भरलेल्या ३९ हजार ७५ या शेतकऱ्यांचा पिकविम्या बाबत विचार केला आहे त्यामुळे सोयगावच्या शेतकऱ्यांनी पीकविमा बाबत निश्चित राहावे असेही त्यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यसाठी अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाई पोटी निधी शासनाने दिला आहे त्यामुळे अतिवृष्टीची एन डी आर एफ आणि पीकविमा या दोन्ही पिकांच्या नुकसानीच्या रक्कम एकाचवेळी दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल
पीकविमा भरला परंतु नुकसानीची पूर्वसूचना दिलेली नाही असे दहा हजार शेतकरी अद्यापही पूर्वसूचनेच्या तक्रारी पासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतातही पीकविमा कंपनीचे अधिकारी पाहणी साठी जातील त्यामुळे या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ होईल असे संकेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.