Type Here to Get Search Results !

जरंडीत विविध विकास कामांचे उदघाटन.






जरंडीत विविध विकास कामांचे उदघाटन.

सोयगाव,दि.२१....., येत्या दोन वर्षात मतदारसंघात येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील एकही प्रमुख रस्ता , पाणंद रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार जरंडी ता.सोयगाव येथे सोमवारी केले.जरंडी येथे सामाजिक सभागृहाचे उदघाटन करतांना ते बोलत होते.

       मातोश्री पाणंद रस्ते, लेखाशीर्ष 2515, 3054 अशा विविध योजनेतून प्रमुख रस्त्यासंह गावंतर्गत रस्ते, शेत रस्ते यासह गावागावात पायाभूत - मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील तिखि, कवली, बहुलखेडा, रामपूरवाडी, रामपूर तांडा, न्हावीतांडा, निंबायती तांडा, निंबायती गाव, जरंडी, माळेगाव, पिंप्री आमखेडा, पळासखेडा या गावात मातोश्री पाणंद रस्ते विकासासह गावंतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी जवळपास 20 कोटीचा निधी मंजूर झाला. या कामांचे भूमिपूजन सोमवार ( दि.21 ) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विविध गावातील नागरिकांशी संवाद साधत असतांना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

 शासकीय कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत करण्यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोयगाव तालुक्यात बहुतांश गावे ही डोंगर व तांडा वस्त्यात विखुरलेली असल्याने सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी गावागावांत खातेनिहाय योजनेची माहिती देवून शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, श्रीराम चौधरी,राजू चौधरी, सुनील चौधरी, माजी सभापती नंदाबाई आगे,, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,.बांधकाम अभियंता राजेश राजगुरू, .पाणी पुरवठा शाखा अभियंता प्रशांत वराडे, जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र अष्टोरे, शाखा अभियंता अक्षय जवडे, सार्वजनिक बांधकाम अभियंता सुभाष सोनवणे , मंगेश पाटील, जुबेदाबी तडवी, रियास पठाण, मुश्ताक शेख, भरत राठोड, सांडू राठोड, यशवंत जाधव, शमा तडवी, समाधान तायडे, सुधाकर चौधरी , उत्तम गवळे, लाला वाघ, आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News