मुरबाड दिनांक 14 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुलांचे लाडके चाचाजी ,देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो.वेळूक शाळेतही बालदिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले
शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले यानंतर पंडित नेहरू यांच्या जीवनावर आधारित लघुपट टीव्ही वर दाखवण्यात आला
याप्रसंगी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ,इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते उत्तम चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप करण्यात आली ,यानंतर विद्यार्थांच्या आनंदासाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला ,
यानंतर सर्व विद्यार्थ्याना चॉकलेट वाटप करण्यात आले सर्व स्पर्धाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षिका श्रीम गायत्री जोशी व शिक्षक श्री आनंद खवणेकर यांनी केले