नायगाव शिवारात दरोड्यातील घटनास्थळी पाहणी करतांना पोलीस निरीक्षक अनमोल केदार,
दुसऱ्या छायाचित्रात पंचनामा करतांना,
तिसऱ्या छायाचित्रात आरोपीची घटनास्थळी चप्पल
.नायगाव येथे धाडसी दरोडा...चार कीलो चांदी व चार लाख पन्नास हजार रोकड लंपास... सोयगाव तालुक्यातील घटना
सोयगाव, ता.१४(बातमीदार).....नायगांव (ता.सोयगाव) येथे सालगडी म्हणुन काम करणाऱ्या कालु महारिया सेनानी यांच्या घरावर काल रात्री धाडसी दरोडा टाकून चोरट्यांनी चार किलो चांदी आणि चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की वाडी येथील डॉ सुभाष यांच्या शेतात बांधलेल्या झोपडीत सालगडी म्हणून काम करणारे मध्यप्रदेशातील कालु पावरा यांच्या झोपडीत रात्री अज्ञात दरोदेखीरांच्या टोळक्यांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा टाकला त्यावेळी दोन झोपडीत दोन मुले आणि दोन मुली झोपले होते तर पती, पत्नी दोघे झोपडी बाहेर खाटे वर झोपले होते. चार ते पाच दरोदेखीरांनी पाहिले झोपडीचा वीज पुरवठा तोडला अंधाराचा फायदा घेत कालुच्या एकवीस वर्षिय मुलाला नावाने आवाज देऊन उठविले आणि झोपडीत प्रवेश केला घरामध्ये प्रवेश करताच वेरसिंग यास दोन दरोदेखीरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक करत जमिनीत गड्डा खोदून डब्यात ठेवलेली चार किलो चांदी आणि चार लाख पन्नास हजार रुपयाची रोकड लंपास करीत घराबाहेर झोपलेले कालु आणि त्यांच्या पत्नीला चाकू, दांड्याचा धाक दाखवून पळ काढला.
या परिसरात गेली अनेक वर्षापासून एवढी धाडशी चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे
घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनमोल केदार, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गीते, विकास दुबीले, श्रींकात पाटील, राजेंद्र बर्डे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरविली . सोमवारी सकाळी श्वान पथक घेऊन पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुलकर्णी, विलास तळेकर, नंदकिशोर तरडकर संजय मेहेर पथकाने टिपु श्र्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. इथून पुढे हे चोरटे वाहनांमधून पसार झाले असावेत असा अंदाज आहे.
बोटांचे ठसे घेणारी देखील अधिकारी परमेश्वर आडे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मुंजे यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी देखील या ठिकाणी असणारे फिंगरप्रिंट घेतले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा करीत ग्रामस्थांनी शेतीमाल विकून आलेला पैसा घरात न ठेवता बॅंकेत ठेवावा तसेच वाडी वस्तीवर रहाणार्या ग्रामस्थांनी जवळील बॅंकेत खाते उघडून मौल्यवान धातुसाधित रोख रक्कम बॅंकेत ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी केले. एकवीस वर्षिय वेरसिंग आणि सोळा वर्षिय सुनिताचा रहात्या गाव पाडथिया ता. सेंदवा जिल्हा बडवानी येथे जाऊन धुमधडाक्यात लग्न लावण्यासाठी कालु, पत्नी आणि चारही मुलांनी दिवस रात्र मजुरीचे काम करीत गेल्या सात वर्षांपासून पै पै गोळा केलेल्या पैशातून चार किलो चांदी खरेदी केली होती. बॅंकेत कोणाचेही खाते नसल्याने रोकड चार लाख पन्नास हजार रुपये देखील झोपडीत एक गड्डा करीत एका डब्यात ठेवुन गड्डावर कोणालाही संशय येवु नव्हे यासाठी संसाराचा सामान ठेवलेला असलाने कोणालाही एवढा पैसा असेल अशी शंका गेली नाही. चोरट्यांनी झोपडीतील सामान बाजुला करीत गड्डा खोदून डब्यातील चांदी आणि रोख रक्कम लंपास केल्याने जवळील व्यक्तीने चोरीचा बनाव केल्याचा पोलीसांचा अंदाज असुन त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहेत.
चौकट-सोयगाव पोलिसांना घटनास्थळी आरोपीची घटनास्थळी चप्पल आढळली आहे या चप्पलच्या आधारे श्वान पथकास सुंगुण श्वानाने माग काढला होता,परंतु रस्ताच संपल्याने श्वान टिपूने माग डोंगराच्या दिशेने दाखविला...