Type Here to Get Search Results !

बोरद गावाचा विकासासाठी साठी सर्वांनी एकञित यावे - विजय राणा



गावाचा विकासासाठी साठी सर्वांनी एकञित यावे - विजय राणा

तळोदा तालुक्यातील बोरद येथे ग्रामपंचायतीची पहिली मासिक सभा ग्रामपंचायत ऑफिसात लोकनियुक्त सरपंच अनिता मनोहर भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.



     

तत्पूर्वी नवनिर्वाचित तळोदा प.स. उपसभापती तसेच ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा बोरद ग्रामपंचायतिच्या कर्मचार्यांकडून सन्मान करण्यात आला.

Android App Download Now 91 India News Network

    याप्रसंगी सत्कारा प्रसंगी उत्तर देतांना तळोदा पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंग राणा यांनी सांगितले की, निवडणुकीत निवडून आले ल्या आपल्यावर लोकांनी मोठा विश्वास दाखवत गावाच्या विकासाची जबाबदारी आपल्या वर सोपवली आहे. त्याप्रमाणें गावाच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून कूठलाही गट तट न ठेवता सामुहिक रित्या काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक या नात्याने तो कुटुंब प्रमुख असतो म्हणून सरपंचाने देखील आपली जबाबदारी पार पाडत असतांना कर्तव्यांचे भान ठेवावे व जनतेची कामे करतांना सर्वांना समान न्याय द्यावा जेणे करून जनतेला तुमच्या विषयी विश्वास निर्माण होईल.


     बोरद ग्रामपंचायतीच्या पहिल्याच सभेत जन्म, मृत्यू ची नोद, शासनपरी पत्रकाचे वाचन व आलेल्या अर्जावर विचार करणे. यांचा सह अनेक विषरांवर खेळी मेळीचा वातावरणात चर्चा पार पडली. पहिल्याच सभेत साजन शेवाळे, गौतम भिलाव, विठ्ठल ढोढरे, ज्योतीबाई साळवे, जुलफेकार तेली. उपसरपंच निलिमा जाधव, लताबाई पवार. गायत्री भिलाव, निलुबाई ठाकरे, अनिल राजपूत, यांनी बोरद ग्रामपंचायतीच्या ईमारतीला भगवान बिरसा मुंडा भवन तर आत असलेल्या सभागृहाला लोहपुरूप सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात यावे. असा व महाराष्ट्रातील राज्य शासनाने प्रतापगढावरील बे कायदा असलेली अफजल खानांची कबर काढण्याचा जो धाडसी निर्णय घेतला त्या बाबत राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव देखील पारित केला.


   कार्यक्रमांचे सूत्र संचलन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतिष राजपूत, मंगा महाराज, निलेश राजपुत यांनी परिश्रम घेतले.

      या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य रंनसिंग ठाकरे. गुड्डी नाईक, ललिता पवार, वासंती ठाकरे व कर्मचारी संजय भिलाव, सुमित्रा ढोढवे, रविंद्र ठाकरे, उषा ठाकरे, उण्या ठाकरे, कांतिबाई ढोढवे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News