नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने 01 अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास ठोकल्या बेड्या
गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून गुजरात राज्याला लागुन
असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयात देखील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यास भेट दिली होती त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अवैध दारु वाहतुक, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याचे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना निर्देश दिले होते.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी देखील अवैध दारु वाहतुक, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक हे देखील स्वतः सर्व गोष्टीवर देखरेख ठेवून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करीत होते.
दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री नंदुरबार शहरात मच्छी बाजारात एका इसमाकडे गावटी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याचे सुचना दिल्या
नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोउनि सागर आहेर यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ अतुल बिन्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटु धनगर, पोना बलवींद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाट, पोशि अफसर शहा, पोशि अनिल बडे, पोशि विजय नागोड़े यांची दोन पथके तयार केली. सदर पथकांनी मच्छी बाजार परिसरात सापळा रचला असता मच्छी बाजाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा संशयितरीत्या फिरत असतांना दिसून आला.
पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जावू लागला. त्यामुळे पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानं त्याचे नाव पांडुरंग बाबुराव प्रजापती, वय 56 वर्षे, रा. अहिल्याबाई विहीरीजवळ, कुंभारवाडा, नंदुरबार ता. जि. नंदुरबार असे सांगितले. तसेच तो वांरवार त्याचे कमरेला हात लावत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 20,000/- रपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन पिवळया धातुचे जिवंत काडतुसे मिळुन आले. सदरच्या वस्तू पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या. तसेच त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून त्याचे विरुध्द गु. रजि.नं. 744/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चें उल्लंघन 25 सह महा. पो. का. कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोउनि सागर आहेर, पोहेकॉ अतुल बिऱ्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाठ, पोशि अनिल बडे, पोशि विजय नागोडे, पोशि अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.