कृतज्ञता सप्ताह प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दिनांक १२/१२/२०२२ रोजी ८२ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने पालघर जिल्यातील जव्हार मधील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर या शाळेमध्ये कला क्रीडा महोत्सव शाळा पातळीवर दिनांक २८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
आश्रमशाळा वावर येथे खो खो व कबड्डी सामने लहान गट व मोठा गट मुले व मुली यांच्या स्पर्धा शालेय कमिटी सदस्य यशवंत बुधर व शाळा व्यवस्थापन समिती,पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर तसेच वावर वांगणी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित उपसरपंच रमेश बीज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्यात.
ही स्पर्धा शाळा पातळीवर नियोजन करून या ठिकाणी सांघिक ,वैयक्तिक या प्रकारे शाळेचे क्रीडा प्रमुख श्री ठाकरे सर व राठोड सर यांनी योग्य नियोजन या स्पर्धा मध्ये विजयी झालेले सर्व मुले मुली यांना तालुका स्तरावर मोखाडा येथे यांची स्पर्धा पार पडणार असून या तालुका स्तरावर जे मुले मुली विजयी ठरतील त्या सर्वाची पुढील स्पर्धा पनवेल या ठिकाणी स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या होणार असून रयत च्या सर्व ठिकाणी शाळा पातळीवर स्पर्धेचे नियोजन करून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ही अंतिम स्पर्धा पनवेल या ठिकाणी होणार आहे .या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गारुडकर सर,राठोड सर, साळुंखे सर, पाटील सर,निकुंभ सर,भामरे मॅडम,पवार सर, बर्डे सर,रणधीर सर, व इतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.