Type Here to Get Search Results !

दोंडाईचा कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे महात्मा फुले पुण्यतिथी साजरा



दोंडाईचा कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे महात्मा फुले पुण्यतिथी साजरा


 तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील कृषिदूतांतर्फे चिनोदा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भरत पाटील हे होते. तर सतिश निकम, मनोज जावळे, वसंत निकम, मुकेश कर्णकार, समाधान पाटील, जगदीश माळके उपस्थित होते.  

       यावेळी कृषिदूत प्रथमेश पाटील याने विद्यार्थांना महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिदूत प्रणव पाटील, प्रथमेश पाटील, आकाश पानपाटील, रोहितकुमार सुर्यवंशी, आर्यन पवार, श्रेयस शिंदे यांनी परिश्रम घेतले. या कृषिदूतांना दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.राजपूत, कार्यक्रम समन्वयक प्रा.रविंद्र देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक चव्हाण, प्रा.पराग बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad