मोखाडातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरत्या शिक्षकांची मागणी कुसुमताई झोले यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना
पालघर जिल्हा प्रतिनिधी:सुनिल जाबर
मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची रिक्त पदे असून जवळपास मंजूर पदापैकी १५० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.तसेच शाळाभेटी दरम्यान खूप ठिकाणी १ली ते ५ वी च्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत बघायला मिळत आहे.अशा परिस्थितीत तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी या साठी जिल्हा परिषद सदस्य कुसुम ताई झोले यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
तसेच तातडीने भरती न झाल्यास किमान ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत निधीतून अथवा पेसा कायदा निधीतून ग्रामपंचायत आणि शाळा व्यस्थापन समिती पेसा समिती मार्फत ग्रामपंचायत स्तरावर तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्तावर गावातीलच सुशिक्षित तरुणांनी नेमणूक करावी.स्थानिक पातळीवर शिक्षक उपलब्ध होतील जेणेकरून शिक्षकांची कमतरता कमी होवून तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यात व तरुणांना गावातल्या गावात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
एकीकडे कायम शिक्षक पदभरतीची मागणी आदिवासी डीएड, बिएड,कृती समितीकडून करत आहेत.आणि कायम स्वरुपी पदभरती होण्यासाठी सर्व जन जीवाचे रान करताना दिसून येत आहेत.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कुसुम ताई झोले,जिल्हा परिषद अध्यक्ष वैदयही वाढाण मॅडम तसेच मा.भानुदास पालवे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.