जरंडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रक्तदान शिबिर;५० जणांनी केले रक्तदान
छायाचित्र-रक्तदात्याना प्रमाणपत्र देतांना
सोयगाव, दि.०६.लोहपुरुष.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जरंडीला पन्नास दात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली., दरम्यान श्री बालाजी मंदिरात आयोजित या शिबिरात दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी रक्त संकलित केले.,सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय पाटील,प्रकाश पवार,मधुकर पाटील, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश चौधरी, सचिन चौधरी, लोकेश पाटील,रवींद्र पाटील,बालाजी संस्थानचे सुधीर कुलकर्णी, राजेंद्र पाटील, आदींनी शिबिरादरम्यान पुढाकार घेतला होता. यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढीचे प्रशांत चिटणीस, सौ रेवती जोशी, हुमरेताई वाघ,आदींनी रक्तसंकलन केले या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले..