आमदार बबनदादा शिंदे यांनी म्हसोबा देवस्थान साठी दिला सात लाखाचा निधी तर भविष्यातील सर्व समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन
पंढरपूर तालुक्यातील तीन शिवेवर वसलेले विसावा विठ्ठलवाडी हे गांव धरणग्रस्त गाव म्हणून या गावाची ओळख परंतु या गावांमध्ये विकास करण्याकरता तेथील शिक्षक अजय नाना खांडेकर व त्यांच्या सहकार्यांनी आमदार, खासदार,मंत्री महोदयापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून विविध विकास कामे करून घेतली या मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे यांनी आज नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन केले याचबरोबर गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद व गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
दरम्यान धरणग्रस्ताचे गाव असल्याने तसेच तीन शिवेवरील हे गाव असल्याने या गावात विकास करणे कठीण होत असले तरीही आमदार बबनदादा शिंदे यांनी विविध फंडातून गावचा विकास साधला तर येणाऱ्या कालावधीमध्ये गावातील सर्व समस्या व विकास कामे पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांसमोर दिले.
यावेळी बोलताना अजय नाना खांडेकर म्हणाली की....
91 इंडिया न्यूज साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर