जव्हार सिल्वासा रोडवर दोन एस टी बसचा भीषण अपघात काही प्रवाशी जखमी
जव्हार प्रतिनिधी : - दिनेश आंबेकर - वारंवार होणाऱ्या अपघात प्रमाणे क्षेत्रात रस्ते रुंदीकरण व दुरुस्ती करणे काळाची गरज आहे.
जवाहर सिल्वासा रोडवर दोन एस टी बसचा भीषण अपघात ,, २० ते २५ प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे नाशिक सिलवासा आणि जवळ धोकादायक वरणावर समोरा समोर धडक होऊन हा अपघात घडला या अपघात जखमीवर जव्हार मधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत वारंवार घडणाऱ्या अपघातामध्ये अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी दिशादर्शक फळक व रस्ते रुंदीकरण करून धोकेदायक वळणे सरळ करण्यात यावी म्हणून नागरिक मागणी करत आहेत. ग्रामीण भागातील बस सेवा महत्त्वाची असून या भागातील दळणवळणाची साधने नागरिकांकडे नसल्यामुळे त्यांना बस व खाजगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे वारंवार घडणारे अपघात या ठिकाणी असणरी वळणे ही सरळ करून दिशादर्शक माहिती फलक लावणे गरजेचे आहे ?बस अपघातामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे