घरे बंद तरीही लाखोंची धाडली बिले
लाईट नको विज बिल आवरा म्हणत आदिवासी बांधवांनी फोडला टाहो
विद्युत कंपनीचे अधिकारी कंत्राटी ठेकेदार करतात जबरदस्तीने लाईट बिल वसुली
मुरबाड दिनांक 15 प्रतिनिध:- लक्ष्मण पवार
-मुरबाड मध्ये महावितरणचा कंपनीच्या अनागोंदी व भोंगळ कारभाराला इथली जनता कंटाळली असुन, इथला भोंगळ आणि मनमानी कारभार काही थांबता थांबेना, आता तर या कंपनीने चक्क खेड्यापाड्यातील गोरगरिब ,आदिवासी व निराधारांना लाखोंच्या आसपास बिले पाठवली असुन, ती विजबिले भरली नाहीत म्हणून लोकन्यायालया मार्फत कारवाई करणार असा सज्जड दम देत महावितरणचे कर्मचारी सक्तीने वसुली करत आहेत.
अनेक गोरगरिबांना लाखो रुपयांची बिले देऊन महावितरणने कोर्टात हजर होण्यासाठी नोटिसाही पाठवल्या आहेत.
गोर गरीब आदिवासी बांधवांनी ही बिल कशी काय भरायची यासाठी अनेक लोकप्रतिनिधीनींही विज महामंडळाशी संपर्क साधला असताना त्यांनाही समाधानकारक उत्तर भेटत नसल्याचे सांगण्यात आले. असून आता लोकन्यायालयाचा धाक दाखवून सक्तीने वसुली सुरु आहे.
वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी विचारणा केली असता त्यांच्या कडे कोणतही समर्पक उत्तर नसल्याने संशय निर्माण झाला आहे.
यामुळे गोरगरिब लोक संताप व्यक्त करत आहेत. घरातील विजवापर,त्यानुसार येणारे विजबील यात फार मोठी तफावत असुन, अव्वाच्या सव्वा सुडभावनेने पाठवलेली मोठ्या रकमेची बिले आम्ही कशी काय भरायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यात अनेक जेष्ठ नागरिक, निराधार महिला यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
त्यांना न्यायालयात बोलावले असताना न्यायालयात एकही अधिकृत अधिकारी,कर्मचारी किंवा वकील सुध्दा नव्हते फक्त महावितरणचे कंत्राटी वसुली कर्मचारी होते .त्यांना नागरिकांनी विचारणा केली असताना त्यांच्या कडून टोलवा - टोलवीची उत्तरे देण्यात आली.
तर तालुक्यातील मोरोशी या दुर्गम भागातील एका निराधार आदिवासी महिलेच्या मोडक्या घराला 82 हजार 027 रुपये लाईट बिल पाठवुन आपल्या भोंगळ कारभाराचा पुरावाच दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे.