पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
जव्हार:- आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जव्हार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर युवा आदिवासी संघ जव्हार आयुष हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत लहान बालकांची आरोग्य तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाची सुरवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, सदर कार्यक्रमासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हार चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मराड ,तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, सरपंच कल्पेश राऊत, निलेश भोये, ग्रामपंचायत साकुर सरपंच, उपसरपंच ,सदस्य व इतर पदाधिकारी, आयुष हॉस्पिटल नाशिकचे तज्ञ डॉक्टर व युवा आदिवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवा आदिवासी संघ मार्फत मान्यवरांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व आदिवासी बांधव व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आयुष रुग्णालय नाशिक येथून आलेले तज्ञ डॉक्टर यांनी शिबिरात एकूण २७४ बालकांची मोफत तपासणी करून यामध्ये जवळपास २० ते २५ लहान बालके यांची तपासणी दरम्यान आयुष रुग्णालयाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोहार व त्यांची सर्व टीम, आशा वर्कर ताई यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच साकुर गावातील जिजाऊ महिला बचत गटाने यावेळी मोलाचे सहकार्य केले.
तसेच कार्यक्रम नियोजनासाठी युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष अशोक राऊत,कार्याध्यक्ष प्रवीण पवार ,सचिव शैलेश दिघे खजिनदार दीपक भोये, सल्लागार विनोद मौळे, मोखाडा तालुक्यातील बेरिसा ग्रामपंचायतचे सरपंच हिरामण मौळे, राजू भोये, तुळशीराम चौधरी, प्रमोद मौळे, माजी अध्यक्ष हेमंत घेगड, महेश भोये, मनोज कामडी,एकनाथ दरोडा, नरेश मुकणे, दिनेश जाधव ,मनोज गवते ,नरेश कुवरे, इतर सर्व युवा आदिवासी संघाचे आजी-माजी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खानझोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष अशोक राऊत यांनी केले.