Type Here to Get Search Results !

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी ... सोयगाव तालुक्यातील घटना

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी ... सोयगाव तालुक्यातील घटना श्वानांच्या हल्ल्यात गंभीर झालेली महिला


.सोयगाव, दि..२२.....अंगणात चुल पेटविण्यासाठी घराबाहेर आलेल्या महीलेवर वीस श्वानांच्या टोळक्यांनी अचानकपणे हल्ला करीत गंभीर रीत्या जखमी केल्याची घटना वरठाण येथे मंगळवार दि.२२ पहाटे पाच वाजता घडली
गंभीररीत्या जखमी झालेल्या महीलेचे नाव प्रमिलाबाई अणिल खंडाळे वय ४५ आहे. ह्या महीलेस तात्काळ पाचोरा येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...
वरठाण येथील महीला सकाळी पाच वाजता अंगणात चुल पेटविण्यासाठी आली असता गावात मोकाट फीरणारी श्वानांच्या जवळपास वीस श्वानांच्या टोळक्यानी ह्या महीलावर अचानकपणे हल्ला केला सदर महीलेने ह्या लचके तोडून दहा ते पंधरा फूट अंतरावर ओढत घेऊन जात होते तेव्हा महीलेने आरडाओरडा केल्याने गल्लीतील ,नामदेव सुर्यवंशी,चेतन जैन,विजयसिंग खंडाळे,प्रविण सोळंके,रोषण खंडाळे,संदीप सोळंके,अशोक चौधरी, राजेंद्र खंडाळे,मयुर चौधरी, आदींनी काठालाठ्यांनी मोकाट श्वानाना हुसकावित महीलेची सुटका केली ह्या हल्ल्यात महीलाच्या हाता पायाचे व चेहऱ्यावरील लचके तोंडुन रक्तबंबाळ केले असुन गंभीररीत्या जखमी अवस्थेत पाचोरा येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

..सोयगाव तालुक्यात मोकाट श्वानांचा सुळसुळाट..
सोयगाव तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील काही मोकाट श्वान रात्रीच्यावेळी एका वाहनात आणुन सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सोडण्यात आले आहेत गावातील कुत्रे व बाहेरील कुत्रे आमने-सामने आल्यावर मोठा संघर्ष होत असतो ह्या कुत्रमध्ये अनेक श्वानांनी काही विविध प्रकारच्या आजाराची लक्षणे देखील आहेत ही मोकाट श्वान महीलांच्या तसेच लहान बालकांच्या अंगावर धावून येत असल्याच्या घटना घडत आहेत तरी ह्या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुका वासीयांनी केली आहे.

सोयगाव तालुक्यातील मोकाट श्वानांच्या उपाय योजनेची जबाबदारी घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा पूढे येत नसून मात्र त्यावर उपचारासाठी औशोधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे मोकाट श्वानांच्या दाहशतीत ग्रामीण नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडे रेबीज उपलब्ध नाही त्यामुळे भीतीमध्ये वाढ झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News