Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिरढे येथील शेतक-यांच्या दोन डिपींचा वीजपुरवठा सुरळीत : प्रदिप झणझणे




शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिरढे येथील शेतक-यांच्या दोन डिपींचा वीजपुरवठा सुरळीत : प्रदिप झणझणे

फलटण तालुक्यातील मिरढे गावातील शेतकरी बाळू कचरे आणि सिद्धू काळे यांची डिपी बंद असलेबाबतची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रदिप झणझणे यांचेकडे आली होती. तक्रारीनुसार अंदाजे चार महिन्यांपासुन सदर डिपी बंद होते. त्यामुळे त्यांच्या शेतपीकाचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. सदर तक्रार आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रदिप झणझणे यांनी शिवसेना विभाग प्रमुख किसन यादव, शेतकरी बाळू कचरे व सिद्धू काळे यांचेसह फलटण वीज महावितरण उपविभागीय कार्यालयात जाऊन फलटण विभागाचे सह मुख्य अभियंता गणेश जमाले यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची मागणी केली. त्यानुसार दोन दिवसात डिपी बसवण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन जमाले दिले होते.

शिवसेनेच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दोन्ही डिपी तात्काळ बसवण्यात आल्याची माहिती शेतकरी बाळू कचरे व सिद्धू काळे यांचेकडुन मिळाल्याचे प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या माध्यमातून प्रदिप झणझणे मागील प्रदीर्घ कालावधीपासुन महावितरणच्या विरोधात फलटण तालुक्यातील शेतक-यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत व शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान असल्याची भावना फलटण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad