दापोलीतील वादग्रस्त सी कोँच रिसॉर्ट पडण्याचे काम सुरू
इंडीया न्युज प्रतिनीधी
पुणे दि 22: - किरीट सोमय्या यांच्या हातोड्याने अखेर रिसॉर्ट पाडकामाला सुरुवात झाली आहे. रिसॉर्ट साठी झालेला 25 कोटींचा खर्च आला कोठून? हा पैसा वाझेचा की खरमाटेचा असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. साई रीसॉर्ट व सी काँच रिसॉर्ट येत्या तीन महिन्यांत दोन्ही रिसॉर्ट ही जमीदोस्त होतील व अनिल परब यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होऊ शकतो असा ईशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्या ट्विन रिसॉर्ट असलेल्या सी काँच वर पडण्याची कारवाई सुरू आहे. मी पण मोठा हातोडा घेऊन आलो आहे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी पहिला हातोडा मारला आहे. ज्या ठिकाणी हातोडा मारला ती जमीन ना अनिल परब ना सदानंद कदम ना विभास साठेची ही जमीन सरकारची आहे. ही जमीनपण अनिल परब यांनी कब्जा केली होती. हे सगळे पाडण्यासाठी यश कंन्स्ट्रक्शन ला दोन्ही काम टेंडर भरल्यावर मिळाली आहेत. त्यामुळे येत्या ४० ते ५० दिवसात दोनही रीसॉर्ट जमीनदोस्त होतील असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या या लढ्याला यश आल्याचे पहायला मिळत असून अनिल परबांना हा मोठा धक्का असल्याच मानले जात आहे.
दरम्यान ही कारवाई सुरू झाली ला दापोलीचे पदाधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री पटेल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रतिनीधी-. Digambar Waghmare