मुरबाड दिनांक 22 प्रतिनिधी:- लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील फणसोली हनुमान मंदिर येथे श्रीकांत धुमाळ फाउंडेशन तर्फे व लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट च्या वतीने आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला नागरिक व महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नेत्र , मोतीबिंदू, काचबिंदू , पडद्याची तसेच तिरळेपणाची तपासणी करून घेऊन डोळ्यांच्या शस्त्रक्रिया संबंधी माहिती जाणून घेतली
या शिबिरात डोळ्यांची पूर्णतः तपासणी करून चष्म्याचा अचूक नंबर इतर ऑपरेशन साठी पनवेल येथे जाणे आणि येण्यासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती व श्रीकांत धुमाळ फाउंडेशन चे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत धुमाळ यांनी नागरिकांना केले आहे
या शिबिराला मुरबाड तालुका आरपीआय आठवले पक्षाचे कर्तव्य तत्पर अध्यक्ष दिनेशजी गणपत उघडे यांच्यासोबत आरपीआय आठवले पक्षाचे मुरबाड तालुका धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहून मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला
तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, दिलीप पवार, शंकर करडे ,लक्ष्मण पवार यांनी मोफत नेतृत तपासणी शिबिराचे वृत्त संकलन करून नागरिकांना जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ मिळावा त्यासाठी प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे
या शिबिरासाठी विशेष सहकार्य फणसोली गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य , ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी करून समाजाप्रती सद्भावना ( सदभावना ) प्रकट केली आहे
मुरबाडहून ९१ इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण पवार