पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली ग्रुप ग्रामपंचायत रुईघर बोपदरी मध्ये २ महसूल गावे असून येथील लोकसंख्या ही चार हजारहून जास्त असतील यांना तालुक्या पर्यंत जाण्याचा मुख्य रस्ता हा दाभेरी गावापासून थोडा अंतरावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून तिकडणे रुईघर पासून ते बोपदरी गावाच्या पुढे थोडा अंतरावर रस्त्याचे काम झालेले असून गोंडपाडा येथील मुख्य घाटाचा रस्ता हा खूप वर्षा पूर्वी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले असून येथील नागरिकांना प्रवास करताना खूपच त्रास होत आहे.
रूईघर बस रात्रीची सुरळीत सुरू होती परंतु रस्ता हा खूपच वाईट असल्याने बस सुद्धा बंद करण्यात आली आहे बस बंद असल्याने येथील मुलांना शाळेत किंवा कॉलेज ला जाण्यासाठी खूपच अडचण निर्माण झाली आहे म्हणून येथील नागरिक हे आता खूपच हैराण झाले आहेत.आणि सर्व नागरिकांचे मनात एकच उद्देश की हे रस्त्याचे डांबरीकरण कधी होईल .मोटार सायकल वर येण्यासाठी तर खूपच अडचण होत आहे डबल शिट असेल तर एक जण उतरून यावे लागते एवढा खडतर प्रवास करावा लागत आहे.
येथील नागरिकांची रस्त्याची समस्या ही वेळोवेळी बांधकाम विभाग कडे किंवा प्रशासनाकडे यांच्या लक्षात आणून देत असून अजून पर्यंत रस्ता आहे तसाच बघायला मिळत आहे .रुईघर बोपदरी ग्रामपंचायत ही गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश यांचे बॉर्डर वर असून महाराष्टातील शेवटचे टोक आहे.म्हणून हा भाग अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो.आणि या भागाकडे जास्तीत जास्त शासनाचे दुर्लक्ष होत आहे.तर येथील नागरिकांची अशी अपेक्षा आहे की बांधकाम विभागाने किंवा शासनाने प्रत्यक्ष या भागाकडे येऊन भेट द्यावी आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा जेणेकरून आम्हाला तालुका पर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ न घेता कमी वेळात जाता येईल अशे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.