Type Here to Get Search Results !

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची - शमा पवार




तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची - शमा पवार

प्रतिनिधी - सौ. मंजूश्री संतोष काळे
सोलापूर

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धूम्रपानामुळे प्रत्येकी पाचवा माणूस बळी पडत आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. 

युवकांचे कॅन्सर मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे सामाजिक समतोल बिघडत आहे. 
कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत असून याला आळा घालण्याकरता तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यावतीने सोलापूर शहरात पुढील चार दिवस तंबाखूचे दुष्परिणाम दाखवणाऱ्या चित्ररथाद्वारे जनजागृती पर अभियान राबविण्यात येणार आहे या चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार बोलत होत्या. 
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यावतीने तंबाखूचे दुष्परिणाम दाखवणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते झाले. 

त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस एम कुलकर्णी, विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, नशाबंदी मंडळाचे प्रमुख रुस्तुम कंप्पल्ली, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समोपदेशिका मंजुश्री मुळे, सामाजिक कार्यकर्ते अमित महाडिक, नामदेव भैरी तसेच पोलीस अधीक्षक कार्यातील अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad