Type Here to Get Search Results !

इस्लापूर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सांगता संपन्न




इस्लापूर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सांगता संपन्न

किनवट प्रतिनिधी: गजानन वानोळे




किनवट तालुक्यातील इस्लापूर मध्ये हनुमान मंदिरासमोर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाला असून या सप्ताहासाठी संगीतमय भागवत कथा ह. भ. प. श्री जगदीशानंदजी महाराज शास्त्री , ज्ञानेश्वरी पारायण ह. भ. प. गीताई पाचपुते ,संगीत संयोजक . ह . भ. प.नारायण महाराज गरड ,तबलावादक ह. भ. प . सचिन महाराज राठोड, (आळंदी) ऑर्गनवादक ह. भ. प. आकाश महाराज सुरडकर , मृदंगाचार्य ह.भ.प. अजिंक्य महाराज फुलाते, गायनाचार्य ह. भ. प. संतोष महाराज मस्के, ह. भ. प. विष्णानाथ महाराज बिगेवाड, (आळंदी) भजनी मंडळ. श्री ज्ञानराज माऊली वारकरी संस्था आळंदी , हनुमान भजनी मंडळ, इस्लापूर , गजानन भजनी मंडळ इस्लापूर यांचे भजन कीर्तन या सप्ताह मध्ये झालेली आहे दिपीत्सव सोहळा दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आला आहे या सप्ताहामुळे इस्लापूरमध्ये भजन कीर्तनामुळे सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले .कीर्तन ऐकण्यासाठी महिला पुरुष लहान तर प्रचंड गर्दी करताना दिसून आलाय दिनांक 22 नंबर 2022 रोजी ज्ञानेश्वरी माऊली यांची पालखी हनुमान मंदीरापासून ते ईच्छा पूर्ती गणेश मंदिर पर्यंत काढण्यात आलीय या सप्ताहाची सांगता आज संपन्न होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजेच काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. या सप्ताहासाठी इस्लापूर येथील समस्त गावकरी मंडळी यांनी प्रतिसाद दिलाय.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad