जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर.
रक्तदान, वह्या वाटप, रुग्णाना ब्लॅंकेट, फळे वाटप इ. कार्यक्रमाची रेलचेल.
मोखाडा : आपला माणूस या ब्रीदावलीने ओळखले जाणारे विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात विविध भागात अनेक उपक्रम राबविण्यात आले. भुसारा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील गरजू गरीब रुग्णाना थंडीमध्ये उब मिळावी यासाठी राष्ट्रवादी युवा मोखाडा याच्याकडुन ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तर शहर राष्ट्रवादीकडून फळे आणि बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रुग्णालयांत फळांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी विक्रमगड विधानसभा अध्यक्ष विराज पाटील आणि टीम कडून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले तर वाडा ग्रामीण रुग्णालयातही फळांचे वाटप झाले. यावेळी पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके भेट द्यावी या आमदार सुनिल भुसारा यांच्या आवाहनला प्रतिसाद. मोठया प्रमाणावर पुस्तकांची भेट सदिच्छा म्हणून देण्यात आली. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचे आमदार भुसारा यांनी आभार मानले.
अशीही भेट
आमदार सुनिल भुसारा यांनी ४३ व्या वर्षात पदार्पण केले असून यावेळी पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तकांची भेट द्या जेणेकरून हि पुस्तके वाचनालयास मदत म्हणून देता येतील आणि त्या भेटवस्तुंचा उपयोग होईल अशी यामागची भावना होती याला सर्वानीच मोठा प्रतिसाद दिला तर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुका प्रमुख अमोल पाटील आणि माजी सभापती प्रदिप वाघ यांनी तब्बल ४३ पुस्तके भेट देत एक अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.