Type Here to Get Search Results !

बोधडीच्या ऑटोचा झळकवाडीच्या घाटात अपघात.दोघाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी.




बोधडीच्या ऑटोचा झळकवाडीच्या घाटात अपघात.दोघाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी.

तेलंगणातील आडेेली देवीच्या दर्शनासाठी जातानाची दुर्दैवी घटना घडली.   

किनवट तालुक्यातील शिवणी पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात बोधडी येथील भाविक दहा वाजेच्या सुमारास तेंलगंणा येथील प्रसिद्ध असलेली आडेली देवी मंडल सारंगापुर जिल्हा निर्मल येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ऑटो वरील ताबा सुटल्याने ऑटो पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाले तर त्यातील दोन जण गंभिर जखमी झाले असून इतर जखमींना पुढील उपचारासाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी किनवट हलवण्यात आले आहे. किनवट तालुक्यातील बोधडी येथील भाविक दि १ नोव्हेबर मंगळवार रोजी सकाळी बोधडी हुन तेलंगणातील आडली देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी ऑटोतुन प्रवास करत असताना हा ऑटो जलधरा ते झळकवाडी मार्गावर असणाऱ्या झळकवाडी येथील उतार असणाऱ्या घाटात चालकांचा ताबा सुटल्याने आटो पलटी झाला असून यात बालाजी पांडुरंग खोकले वय (९ ) व नागेश रामा टारपे (२० ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन गंभीर जखमीं झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी किनवट येथील ग्रामीण रुग्णलाय येथे पाठवण्यात आले असून.इतर सहा जणांना किरकोळ मार लागला असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑटो चालक गणेश गवळे, सुनील रामा टारपे,विशाल चंद्रकांत टारपे,विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे ,मारुती बोंबले, यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. या घटनेची माहिती इस्लापूर पोलीस स्टेशनला कळताच पोलीस सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख व बीट आमदार संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस सह्यक निरीक्षक ऱघुनाथ शेवाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. सदरील घटनेची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असता घटना स्थळी भाजपा तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार शिवणी येथील सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडूळे गजानन बच्चेवार शेख जब्बार यांनी धाव घेतली व गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.तर या दुर्देवी घटनेत दोन तरुण दगावल्याने बोधडी,जलधारा शिवणी परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad