आज पंढरपूर ते कराड रस्त्यावर सोनंके येथे ऊस दर संघर्ष समिती व ऊस ऊस उत्पादक शेतकर्यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आमची मागणी सोलापूर जिल्ह्यातील ऊसाला पहिली उचल 2500 रूपये व फायनल 3100 रूपये मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली..
गेली दहा दिवस झाले गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू होते परत ह्या मार्गाने कारखानदाराला व प्रशासनाला भाषा कळत नसेलतर ह्या जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज रस्ता रोकोच्या माध्यमातून दोन दिवस एकादशी मुळे अल्टीमेट दिला आहे जर दोन दिवसात पहिली उचल जाहीर नाही केली तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमनला सोडणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानीचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी दिला.
यावेळी दिपक भोसले,समाधान फाटे,माऊली हळणवर, माऊली जवळेकर,तानाजी बागल,विश्रांती भुसणर,बाळासाहेब जगदाळे, तानाजी गोपणे,मल्लारी खरात,बाबा हाके,दत्ता खरात सरपंच,नवनाथ हाके,सर्जराव मासाळ,समाधान महाणवर अनेक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते