Type Here to Get Search Results !

पंढरपूर शहरातील हिंदू स्मशान भूमीच्या दुरुस्ती आणि नूतनिकरणाचे काम मनसेच्या वतीने स्वखर्चाने सुरू मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे स्तुत्य उपक्रम




पंढरपूर शहरातील हिंदू स्मशान भूमीच्या दुरुस्ती आणि नूतनिकरणाचे काम मनसेच्या वतीने स्वखर्चाने सुरू
मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे स्तुत्य उपक्रम




पंढरपूर शहरातील हिंदू स्मशान भूमीमध्ये मृत्यूनंतर ज्या कट्यावर दहन करण्यात येते ते पाचही कट्टे खूपच खराब झालेले आहेत. कट्यावरील सर्व काँक्रीट फुटलेले असून. विटा तुटलेल्या आहेत. दहन करताना या ठिकाणी अडचणी येत आहेत. या सर्वच कट्याची दुरुस्ती आणि नवीन फायर ब्रिक्स विटा बसवण्याचे काम मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने स्वखर्चाने करून देण्यात येत आहे. एक कट्टा दुरुस्ती ला तीन दिवस लागणार असून सलग पंधरा दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे झाले या स्मशान भूमीची अवस्था दयनीय झाली असून प्रचंड अस्वच्छता पसरली आहे ही स्मशान भूमी दुरुस्त करण्याची शहरातील नागरिकांची अनेक दिवसाची मागणी असुन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.




 त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. दहन करताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत .
आज पासून या सर्वच कट्यांची दुरुस्ती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने स्वखर्चाने करण्यात येणार आहे .






यासाठी खास सातारा येथून फायर ब्रिक्स वीट आणण्यात आली आहे. या सर्व कट्याच्या दुरुस्तीचे नवीन बांधकाम करण्याचे काम रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून हिंदू स्मशानभूमी येथे करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला असून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्मशान भूमीचा पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येणार असून नागरिकांना बसण्यासाठी चांगली सोय करण्यात येणार आहे.




यावेळी समाजसेवक नानासाहेब कदम, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक महंमद उस्ताद, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे, मनसेवक शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,राष्ट्रवादीचे श्रीकांत आबा शिंदे, साईनाथ बडवे, समाजसेवक बजरंग बंदपट्टे,सुरज देवकर, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, नगरसेवक विवेक बेणारे, अभयशिंग इचगावकर, माधव महाराज बडवे,सतीश आप्पा शिंदे,अमर सूर्यवंशी, सागर कदम,पिंटू मांडवे, दत्तात्रय बडवे,श्याम गोगाव ,अमोल आटकळे, शहाजी शिंदे,शैलेश कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

91इंण्डिया न्यूज साठी दिनेश खंडेलवाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News