राज्यात व केंद्रात आपले सरकार असल्याने कारखाना आणखी प्रगती करेल - खा.महाडिक
पंढरपूर: भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे रणसिंग फुखलेले असतानाच भीमा शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात आज वडवळ येथून होणार आहे. याचवेळी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून केवळ विरोधाला विरोध म्हणूनच ही निवडणूक सभासदांवर लादल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना व्यक्त केली.
केवळ विरोधाला विरोध म्हणून भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली गेली असून संस्थेचे ध्येय लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते तसे मी विरोधकांना संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून आवाहन केले होते. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने ही निवडणूक दुर्दैवाने लादली तर ज्यावेळी २००६ ला संस्था अडचणीत येता कामानये म्हणून आपण स्वतः विरोधकांनी आपआपसात निवडणुक न लढवण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत ती निवडणुक बिनविरोध दिली होती. त्याच फक्त एकच कारण म्हणजे की ही संस्था मोठ्या महाडिकसाहेबांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उभी केलेली आहे. त्यामुळे संस्था जर अडचणीत येत असेल तर निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी शेतकरी सभासदांसमोर बोलताना सांगितले. त्यावेळी माझ्यावरही भिमा परिवारातील नेते शेतकरी सभासद आणि संचालकांचा दबाव होता. परंतु मी परिवाराचा प्रमुख या नात्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांना संस्थेच्या परिस्थितीची पुर्ण कल्पना देऊन ही निवडणूक आपण संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेऊन न लढवण्याचा निर्णय मोठ्या मनाने घेतला होता. दरम्यान विरोधक ही निवडणूक विरोधाला विरोध म्हणून लढवत असल्याने सभासद शेतकऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. तरीही यंदा "भीमा शेतकरी विकास आघाडी" हॅट्रिक करणारच अशी बोलकी प्रतिक्रिया खा. धनंजय महाडिक यांनी दिली.
91इंण्डिया न्यूज साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर