Type Here to Get Search Results !

आ.बबनदादा ऊसाला 2500 रुपये जाहिर केले आसते तर तुम्हाला गरीबी आली आसती का - राहूल बिडवे




आ.बबनदादा ऊसाला 2500 रुपये जाहिर केले आसते तर तुम्हाला गरीबी आली आसती का* - राहूल बिङवे

माळशिरस तालूक्यात ऊस दर आंदोलन चिघळणार

अकलूज - उधारीवर उस घ्यायचा, रोखीत विकायचा आणी शेतक-यांना तीन टप्प्यात पैसे द्यायचा धंदा आता बंद करा. शेतक-यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून दिल्याशिवाय आता शेतकरी संघटना आंदोलने थांबवणार नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारानवर आ.बबनराव शिंदे दबाव टाकून मुद्दाम ऊसदराची कोंडी फुटु देत नाही त्यांनी जर 2500 रुपये जाहीर केले आसते तर काय गरीबी आली आसती का अशी घणाघाती टिका रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल बिङवे यांनी अकलूज येथे पञकर परिषदेत सांगितले.

बिङवे म्हणाले, प्रत्येक शेतकरी संघटनेच्या मागण्या यापुर्वी वेगळ्या होत्या. त्यामुळे एकवाक्यता होत नव्हती. परंतू शेतक-यांचे हित लक्षात घेता आता सर्व संघटना एकञ येऊन कारखान्यांविरोधात आंदोलन करत आहेत. पहीला हप्ता २ हजार ५०० रुपये व अंतिम बिल ३ हजार १०० रुपये मिळाल्याशिवाय आंदोलने थांबणार नाहीत.

पोटॕश पुर्वी ८०० रुपयांना मिळत होते. आज त्याचा दर १ हजार ७०० रुपये झाला आहे. १८-४६ पुर्वी ७०० रुपयांना मिळत होते ते आज १ हजार ४०० रुपयांना तर १०-२६-२६ पुर्वी ९०० रुपयांना मिळत होते ते आज १ हजार ३५० रुपयांना मिळत आहे. युरीयाचे दर माञ फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले नाहीत. राऊंङअप ३०० रुपयांवरुन ७०० रुपयांना झाले तर एकरी नांगरणी १ हजार ८०० रुपयांवरुन ३ हजार ५०० रुपये झाली आहे. मजूरांच्या मजूरीत वाढ झाली आहे. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे कमी दरात ऊस कारखान्यांना देणे आता शेतक-यांना परवङेनासे झाले आहे. ऊस तुटुन करखान्यास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पुर्ण रक्कम दिली पाहीजे असा ऊस दर अध्यादेश १९६६ सांगतो. पण कारखानदार या कायद्याचे पालन न करता मनमानी करत आहेत.

माळशिरस तालूक्यातील आंदोलन आता तीव्र होत आहे. आम्ही आरटीओला सुध्दा अवैध ऊस वाहतुकी विषयी निवेदन दिले आहे. बजाटने ऊस वाहतुकीला परवानगी नसताना सर्वच कारखान्यांकङुन ऊस वाहतुकीसाठी बजाटचा सर्रास वापर केला जातोय. एका ऊसाच्या ट्राॕलीला ६ टन ऊस वाहण्याची परवानगी असताना अतिरीक्त भाराने ऊस वाहतुक केली जातेय. जर हे प्रकार तातङीने थांबले नाहीत तर आरटीओच्या दारात आंदोलन केले जाईल.

माळशिरस तालूक्यात शेतकरी संघटना ऊस दरा विषयी आक्रमक झाली आहे. तालूक्याच्या वेळापूर, माळखांबी, दसूर, साळमूख, मळोली या परीसरामध्ये ऊस वाहतुकीची वाहने अङवणे, टायर फोङणे असे प्रकार झाले आहेत. लवकरच कारखानदारांनी ऊस दराविषयी ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी चिघळणार असल्याचा इशारा राहूल बिङवे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad