पिके पडत आहेत पिवळी शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण
वन्य प्राण्यांनकडुन होत आहे पिकांची नासाडी
कुषी तज्ञांकडून मार्गदर्शनाची आवश्यकता
अकोट प्रतिनिधी कुशल भगत
कुटासा.परिसरात अतिवृष्टी व संततधार पावसाच्या संकटानंतर कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.कुटासा शेत शिवारातील कपाशी पिकावर प्रादुर्भाव दिसून येत आहे.आधीच सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून सडत आहेत.काही ठिकाणी कपाशीचा पाला व फुले गळून पडत आहेत तर काही भागात कपाशीची झाडेच वाळू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे कपाशी, सोयाबीन,आदी पिकांचे नुकसान झाले. यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात सुद्धा घट झाली. मृग नक्षत्रात पावसाच्या लहरीपणामुळे दुबार तर काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिपावसामुळे मूग, उडदाचे पीक हातचे गेले. आता कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.भरपाई मिळणार कधी?
गत काही दिवसांआधी ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाली नाही.
खर्च निघणार की नाही?
आता पीक काढणीला आले आहे; परंतु अतिवृष्टी, संततधार पाऊस व आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.
*प्रतिक्रिया* किरन नवलकार शेतकरी कुटासा
कपाशी पिकावर वन्य प्राणी हल्ला करत असुन कपाशी पिकांच्या बोंड्या खात असुन नुकसान करत आहेत व त्यातच आता शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी पिकांवर लाल्या रोगाने आक्रमण केल्यामुळे कपाशी उत्पादनात घट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
प्रतिक्रिया महादेव सोनकुवर शेतकरी कुटासा
मागील काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी मुंग सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व आता कपाशीचे पिके पिवळी पडत असुन लाल्या रोगांचे आक्रमक पिकांवर झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,