आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अग्रगण्य असलेल्या श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली पतसंस्थेच्या चेअरमन पदी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री पुरुषोत्तम खंडू भास्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी माननीय श्री पांडुरंग गंगाराम अभंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती आंबेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक पी एस रोकडे साहेब यांनी दिली नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभ सहाय्यक निबंधक रोकडे साहेब यांच्या हस्ते मंचर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे श्री पुरुषोत्तम खंडू भास्कर चेअरमन श्री पांडुरंग अभंग व्हाईस चेअरमन संचालक मंडळातील सदस्य श्री कैलास चिंतामण सोमवंशी श्री नामदेव चिमाजी भास्कर श्री गोविंद तुळशीराम घोडेकर श्री लक्ष्मण सहादु झोडगे श्री अजित उत्तमचंद खिवंसरा श्री कपिल किसन कांबळे श्रीसुनील लक्ष्मण आकले सौ रत्ना विकास गाडे सौ शशिकला नामदेव पोखरकर या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सन्मान समारंभ सहाय्यक निबंधक पी एस रोकडे व आंबेगाव तालुका काँग्रेस आईचे अध्यक्ष राजू इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी एलआयसीचे विकास अधिकारी अनिल घोडेकर ओंकार ऑफ साईडचे मालक प्रवीण शेठ भास्कर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी केले तर आभार आंबेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजु इनामदार यांनी मानले
प्रतिनधी - प्राजक्ता किशोर औटी