पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार:- दिनांक.16/11/2022 रोजी जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायत मधील बहुचर्चित असलेेला सीबादेवी ते वड पाडा हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून सातत्य पूर्ण पाठ पुरावा केला जात होता. आज अखेर या रस्त्याच्या मजबुतीकरण व घाट तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या मधे सिंहांचा वाटा जव्हार पंचायत समितीचे कार्यशील गट विकास अधिकारी समीर वाठरकर व टाटा मोटर्स संस्थेचे मोठे योगदान आहे. या वेळी एकनाथ दरोडा यांनी या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की या बहुचर्चित सिबादेवी ते वडपाडा येथील रस्त्याचे मजबुती करणचे आज काम सुरू करण्यात आले असून या रस्त्या मुळे वडपाडा, मन मोहाडी, भाटी पाडा व कुकडी हि मुख्य गावे प्रवाहात येणार आहेत. या रस्त्यामुळे येथील जनतेचा प्रवास सुखकर होईल. जो पर्यन्त डांबरीकरण होऊन या लोकांची गैर समस्या दूर होत नाही तो पर्यंत मी थांबणार नाही, खांद्यावरची डोली उतरणार नाही तो पर्यंत या जनतेसाठी लढणार. एकनाथ दरोडा (सरपंच झाप ग्रामपंचायत तथा बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका).
या वेळी झाप ग्रामपंचायत सदस्य विलास बागुल,अनिता खांझोडे,लक्ष्मण खांझोडे,जगन खांझोडे,चंद्रकांत वाढू,माजी सरपंच तुकाराम गरेल,ग्रामपंचायत सदस्य पंडित गरेल,पोलिस पाटील जानु दखने,युवराज गवारी,रवी वाजे,बाबू गीरांधले व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
जो पर्यन्त डांबरीकरण होऊन या लोकांची गैर सोय व समस्या दूर होत नाही तो पर्यंत मी थांबणार नाही, खांद्यावरची डोली उतरणार नाही तो पर्यंत या जनतेसाठी लढणार.
(एकनाथ दरोडा:- सरपंच झाप ग्रामपंचायत तथा बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका)