मुरबाड प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
ठाण्यातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्ष प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणार्या राज्यस्तरीय कुमार व मुली गटाच्या स्पर्धे करिता आपल्या श्री मावळी मंडळचे खो खो संघाचे ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
प्रणय कमले हे मावळी मंडळ संस्थेच्या क्रीडा प्रशिक्षकपदी कार्यरत असून ते कबड्डी, खो खो, अॅथलेटिक्स आदी विविध खेळांसाठी छोट्यांपासून कुमारवयीन गटातील मुलांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या प्रशिक्षण काळात संस्थेने अनेक राष्ट्रीय, राज्य व आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांना मावळी मंडळ संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक मिलिंद यादव, मिलिंद कदम, दर्शन देवरुखकर, प्रथमेश तांडेल, नाईक व बाबू क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी होतकरू खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहेत. संस्थेचे विश्वस्त श्री कृष्णा डोंगरे, श्री सुधाकर मोरे , श्री प्रभाकर सुर्वे व संस्थेचे कार्यकर्ते या वर जातीने लक्ष घालत असतात.
श्री प्रणय कमले यांच्या निवडीबद्दल श्री मावळी मंडळ शिक्षण संस्था व ठाणेकरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान, अलिबाग येथे होणार्या राज्यस्तरीय कुमार गटाच्या स्पर्धे भ करिता आपल्या श्री मावळी मंडळ च्या कुमार संघातील कु. शुभम प्रमोद जाधव आणि कू. तनिष गणेश फाटे ह्या दोन खेळाडूंचे ठाणे जिल्हा कुमार गटाच्या संघात निवड झाली आहे.