Type Here to Get Search Results !

कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा ठाणे व पालघर च्या वतीने धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी




कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा ठाणे व पालघर च्या वतीने धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी


मुरबाड दिनांक 16 प्रतिनिधी:- लक्ष्मण पवार




        आज दिनांक १५/११/२०२२ला कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतिने भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,जयंतीस कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा श्री अशोक भवारी साहेब उपस्थित होते याप्रसंगी जल ,जमीन आणि जंगल वाचवण्यासाठी बिरसामुंडा यांनी ब्रिटिश सरकार विरोधात सशस्त्र लढा दिला हा ब्रिटिशाविरोधातील पहिलाच लढा असल्याने ते आद्यक्रांतिकारक ठरतात आजही उलगूलान म्हणजे बेकारी,गरिबी,भ्रष्टाचार,आदी समस्या सोडवण्यासाठी चळवळीची गरज आहे व मागासवर्गीय शिक्षकांनी आपले कर्तव्य ओळखून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली




कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे दिनांक २८,२९,३० नोव्हेंबर २०२२ ला
       असल्याने त्याचे नियोजन करण्यात आले 

 १)अधिवेशनाकरीता जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी प्रथम आपला निधी जमा करावा.
२) तालुका निहाय सदस्य नोंदनी तालुका कार्यकारणीने करुन सदस्य फी दिनांक 20 नोव्हेबर पर्यत जिल्हा शाखेस देणे याला तालुका शाखेने युद्ध पातळीवर काम करणे,तसेच प्रत्येक तालुक्याने आपली स्वतन्त्र् मिटिंग आयोजित करणे ,पत्रके वाटप करून अधिवेशनाचा प्रचार प्रसार करणे या सूचना देण्यात आल्या
३) प्रत्येक तालुक्यात / महानगरपालिका क्षेत्रातील अध्यक्ष यांनी अधिवेशन नियोजन करणे वजास्तित जास्त शिक्षक बांधव अधिवेशनास उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करतील तसेच सहकुटुंब कोल्हापूर व परिसर पर्यटन देखील करतील असा प्रचार प्रसार करावा
४) ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याने अधिवेशनाची प्रसिद्धी करने .व शाळा भेटीचे नियोजन करावे




अधिवेशनात मंत्री महोदयासमोर घरभाडे भत्त्यासाठी मुख्यालय रहाणे अट रद्द करणे,जुनी पेन्शन योजना ,सर्व प्रकारच्या पदोन्नत्या केवळ शिक्षकामंधून भरणे ,सरळसेवा भरती अनुषेश भरून काढून शिक्षक भरती करणे ,पदोन्नती आरक्षण आदी विषयावर ठोस तोडगा काढण्याचे प्रयत्न होणार आहेत

अधिवेशनासाठी ठाणे व पालघर जिल्हा पतपेढी अधिवेशन कर्ज मंजूर करणार आहे तरी आपल्या शाखेत अधिवेशन कर्जासाठी अर्ज व संघटना पावती देऊन सभासदास संघटनेच्या पदाधिकारी यांनी सहकार्य करावे
        
       इत्यादी विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली 

राज्य उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष मा विजयकुमार जाधव यांच्या नियोजनात सभेचे नियोजन करण्यात आले
   
कास्ट्राईब केंद्रप्रमुख संघटनेचे पदाधिकारि मा किशोर भोईर सर यांनी सभेचे अध्यक्ष स्थान भूषवले

कोकण विभागीय अध्यक्ष व पतपेढी संचालक संतोष गाढे यांनि सभेला मार्गदर्शन केले

 सभेसाठी संघटनेचे कोकण विभाग कार्याध्यक्ष मा दिनेश शिंदे तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष नवनाथ जाधव ,पालघर सचिव अनिल राठोड ,ठाणे जिल्हा सचिव प्रवीण कांबळे,नवी मुंबई अध्यक्ष मा व्यंकटेश कांबळे ,कल्याण मनपाचे अध्यक्ष मा संजय ओंकारेश्वर ,मा मुंडे सर ,भिवंडी मनपाचे माध्यमिक अध्यक्ष मा सौदागर शिखरे,मा महेश वणवे,कोशाध्यक्ष मा अरुण हिवरे ,शहापूर तालुका अध्यक्ष मा मनोज गोंधळी ,कार्याध्यक्ष शहापूर मा रतन् रामटेके,कार्याध्यक्ष मा लक्क्ष्मण कांबळे ,जिल्हा कार्य कारिणी सदस्य मा सतीश भोसले ,भिवंडी तालुका कार्याध्यक्ष मा श्यामकांत नवाळे यांनी उपस्थित राहून आपले अधिवेशन यशस्वी करणे व संघटना वाढीसाठी बहुमोल असे विचार मांडले
  
सर्वसामान्य शिक्षकांची एकच दमदार शिक्षक संघटना कास्ट्राईब शिक्षक संघटना 
  जय कास्ट्राईब शिक्षक संघटना

आपला विश्वासू 
 मा प्रवीण कांबळे 
सचिव ठाणे जिल्हा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News